ज्योती महादुले 30 Mar 2023 गीत अन्य ज्योती 36725 0 Hindi :: हिंदी
गीत-मुक्तीची ओढ ---------------------- मुक्त होईल, उद्याची नव पहाट पाखरांची मैफील रंगणार आवाजाचा गजर गुंजणार सुर्यकिरण कोवळे चुंबन घेणार स्वातंत्र्य अबाधित मिळणार मुक्तीची ओढ लागली जिवास मुक्त होईल उद्याची नव पहाट॥धृ॥ दुर-दुर-दुर देशी माती मातीच्या प्रेमात पाऊल पडतील तृणस्पर्शाने नयन चिंब भिजतील नव उत्साहाला भरारी देतील मुक्तीची ओढ लागली जिवास... मुक्त होईल उद्याची नव पहाट॥१॥ रात्रीचा चंद्र, चंद्राची चांदणी दिपणार नयन पुन्हा नव्या राती सुरांच्या साथीस स्वर मिळतील अलंकारिक स्वर डोहीवर येतील खुणावते आहे,कुणीतरी आज बोलावते आहे हवेची चहचहाट मुक्तीची ओढ लागली जिवास.. मुक्त होईल उद्याची नव पहाट॥२॥ हूमऽऽ हूमऽऽ होऽऽ,होऽऽ आऽऽआ