Join Us:
दिशा-लाइव ग्रुप ने लॉन्च किया नया ब्रांड BizPry - लोकल से ग्लोबल तक 20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

सद्याचा स्वातंत्र्य भारत

Samir Lande 20 Aug 2024 आलेख समाजिक #सध्याचास्वातंत्र्यभारत #समीरलांडे #समीरलांडेनाटक #नाटक 30525 0 Hindi :: हिंदी

(टिपः काल्पनिक नाटक)

Seen 1 
(पोस्टर प्रदर्शन)
(भारतात काय काय चांगल होत आहे आणि लोकांचं लक्ष फक्त त्याच गोष्टींवर आहे त्याचे पोस्टर शो )
उदा. क्रिकेट वर्ल्ड कप, सिनेमा , रियाल्टी शो. 

( काही आशा गोष्टी ज्या आपण दुर्लक्ष करत आहे)

(मार्गदर्शक) : नमस्कार मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष पूर्ण झाले 
पण खरच भारताला स्वातंत्र्य मिळाले का?
आज भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणारे महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस ,राजगुरू, चंद्रशेखर आजाद, अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले बलिदान दिले.
पण या सर्व स्वातंत्र्यवीरांचे बलिदान व्यर्थ गेले असे तुम्हाला वाटत नाही का

Seen 2 
( बस स्टॉप वरती एक मुलगा मुलीची छेड करताना) 
मुलगा :  म... कसला गुलाबा सारखा सुगंध येत आहे.

मुलगी : छी ! लांब रहा.

मुलगा: ( मुलीच्या हाताला पकडुन) : 
अग लांब कशाला , चल माझ्या गाडीने तुला घरला सोडतो 
( मुलगी हात झटकते, व मुलगा निघून जातो )

मुलगी : ( सर्वांना मार्गदर्शन करत ) :
 मुलगी वाचवा मुलगी शिकवा. होय मुलगी शिकली पण आईच्या गर्भात किंव्हा असल्या दरिंद्यांच्या सनिंध्यात मुलगी वाचेल का ? मी माझ्या भावाची लाडकी बहिण, वडलांच्या काळजाचा तुकडा आहे . असल्या दरिंद्यान साठी फक्त एक संधी आहे. 
माफ करा पण या स्वातंत्र्य भारतात मुलगी स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य तर तिचे श्वसन करणारे आहे.

Seen 3
( एक श्रीमंत मुलगा त्याच्या गाडीने अपघात करतो व आजूबाजूचे माणसे त्याला पकडतात आणि काहीजण त्या अपघात झालेल्या व्यक्तीचे मदत न करता व्हिडिओ काढतात )
गर्दीतून एक जण : धरा याला चांगला धुवा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या .

पोलिस : ( मुलाला पकडुन ) 
चल रे वय नसताना गाडी चालवतो त्यात पण सोयची नाय.

मुलगा : थांबा , तुम्हाला माहित आहे का? माझे वडील काय करतात .

पोलिस : काय करतात ? 

मुलगा : ह्या शेत्रातील प्रसिद्ध व्यापारी आहे माझे वडील , पाहिजे ते त्यांना भेटून घेऊन देऊन मिटवून घ्या .

पोलिस : म्हणणं तर तुझं बरोबर आहे आणि वय देखील नाही, नवीन नियमानुसार हजार शब्दांचा निबंध लिही आणि जा आणि तुझ्या वडिलांचा नंबर द्यायला विसरू नको.

गर्दीतून एक जण: हा कोणचा नवीन नियम आहे? 
 
पोलिस : आहे आहे आत्ताच मागे लागू झाला .
( पोलीस अपघात केलेल्या मुलाला पकडून नेते व गर्दी देखील ज्याच्या त्याच्या मार्गाला निघून जाते )

Seen 4 
( विनोदी भाग ) , ( अपघात झालेला व्यक्ती उठून बघतो की एक व्यक्ती मदत करण्याचं सोडून व्हिडिओ काढत आहे)
( अपघात झालेला व्यक्ती व्हिडिओ काढणाऱ्याला चप्पल दाखवत हाकलून लावतो) 

अपघाती व्यक्ती : बघितलं मित्रांनो हा आहे स्वातंत्र्य भारत ज्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हेगाराला तुरुंगात टाकलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या पैशाला पाहून तो पोलीस त्याच गुन्हेगाराचा तोंड चोपडेपणा करत आहे. 
आणि आत्ताच्या तरुणांचं तर वेगळेच काहीतरी चाललं आहे,मुलांचं म्हणजे insta वरती भावा एक तुझी आणि एक माझी आणि मुली तर त्याहून पुढे i love BTS .
ज्या ठिकाणी अपघात झालेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे त्या ठिकाणी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागतात. अरे हा कसला आनंद आहे ?
गरिबांना न्याय मिळत नाही आणि आत्ताचे तरुणांच्या तोंडात तर मुंग भरली आहे. 

Seen 5 
(एक व्यक्ती जो शेतकऱ्याच्या मलाच मोल भाव करतो , पण एका दुकानात जाऊन मोल भाव न करता वस्तू विकत घेतो)

खडूस व्यक्ती : ( शेतकऱ्या जवळ येऊन) 
भाज कशी दीली 

शेतकरी : 30 रुपयाला जुडी

खडूस व्यक्ती : काय राव येवढं कुढे महाग आसातय का?
राहुद्या
(तोच खडूस दुकानात जातो)

खडून : शेट एक टोमॅटो सॉस ची बॉटल द्या 

( दुकानदार खडूस ला पाहिजे ते देतो व खडूस निघून जातो)

शेतकरी : देवा पांडुरंगा आर... कस व्हायचं , जो भाजीपाला मी उगवतो त्याचा लोक घेतांना मोल भाव करतात आणि त्याच भाजीपाल्या पासून बनलेली वस्तू लोक विना मोल भाव करता घेतात .

Seen 6 शेवट 
(सर्वजण मेणबत्ती घेऊन व पोस्टर घेऊन रोडवरती येतात) 

मार्गदर्शक : अरे हे सर्व कशासाठी एका महिलेची आब्रू लुटली म्हणून, की विकासाच्या नावा खाली घरे मोडले म्हणून, की स्वतःच्या उद्योगासाठी लाखो झाडे तोडली म्हणून. पण ह्या सर्व गोष्टींची वेळच का येऊ द्यावी.
कोणी दिल्या आमच्या हातात मेणबत्या , का मारू झाडांना मिठ्ठी .
नुसता मेणबत्ती घेऊन स्टोरी ,स्टेटस लावून किंवा झाडांना मिठी मारून हे सर्व थांबणार नाही .
त्या ऐवजी चुका होत्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन तात्काळ त्या गोष्टीचे विरोध करा, जेणेकरून जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे व ज्यांच्यामुळे मिळाले आहे त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

लेखक :- समीर लांडे

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

छेड़ते हुए लड़के ने लड़की से कहा- तुम कितनी सुन्दर हो तुम्हारी आँखे तो ऐसी हैं जैसे समुन्दर हो तम्हारे होठ लाल ऐसे हैं जैसे चुकन्दर ह� read more >>
हमारे देश में बहुत से महापुरुष हुए, बहुत से नेता हुए जिन्होने देश के लिये अपने प्राण तक न्यौछावर कर दिये, सिर्फ देश की एकता व अखण्डता क� read more >>
किसी भी व्यक्ति को जिंदगी में खुशहाल रहना है तो अपनी नजरिया , विचार व्यव्हार को बदलना जरुरी है ! जैसे -धर्य , नजरिया ,सहनशीलता ,ईमानदारी read more >>
Join Us: