Barde Jyoti 14 Apr 2023 कविताएँ समाजिक नात्याला नाव दिले मैत्री 39958 0 Hindi :: हिंदी
भेटलो होतो कधी शाळेच्या
अंगनात, धरला हात हाता मध्ये
खेळलो भन्नाट मध्ये, ओळख नव्हती
तुझी माझी तरी अडकलो कशे
जाळ्यात
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री
एक घास होता जरी ताटात,
दोघींनी मिळुन केला लोण्याचा
गोळा , तोल गेला जरी माझा
पडले नाही कधी कारण हात
होता माझ्या गळ्यात तुझा
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री
चालत असलो जरी वाटेवरून
नजर उतारवत असे सारे जग
ऐकमेकींच्या हातात हात देऊन
डोलवत, बागडत, खेळत जात
राहिलो पुढे
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री
भांडण झाले तुझे माझे जरी
करमत नसे तुझ्यावाचुन सॉरी
शब्दांचा सहारा घेऊन पुन्हा
प्रेमात पडत असे नाते कशे तुझे माझे
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री
नाही धरल्या जाती पाती त्याच मुळे
तर मिसळत राहिलो ऐकमेकींच्या
ह्रदयामध्ये, जळतील किती लोक
आपल्या मैत्रीवरती
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री
मि सांगते तुझला,तू सांग
मजला भेटलो जरी कुठे
पुन्हा एकदा घेऊ जन्म या
जगामध्ये पण साथ तुझी
अशीच असु दे सखे
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री
तुझ्या माझ्या जिवनाचा झरा
इतका पवित्र असु दे, बघुन
लोकांना मोह झाला पाहिजे
काश आपन पण अशीच मैत्री
करुया कि कधी तरी एकदा
तरी बघ सखे त्याच
नात्याला नाव धिले मैत्री